Popular posts from this blog
हिंदी दिवस
बिद्री . हिंदी भाषा संपूर्ण राष्ट्राला एकतेच्या सूत्रात बांधून ठेवते .भारतामध्ये अनेक भाषा असुनही हिंदीचे महत्व अनन्यसाधारण आहे. राष्ट्रभाषेचा प्रचार,प्रसार, सम्मान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी केले.ते दूधसाखर महाविद्यालयात हिंदी विभागावतीने हिंदी दिनानिमित्त भित्तीपत्रकांचे प्रकाशन केल्यानंतर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. सुहानी पाटील यांनी केले. प्रा. डॉ. एस. ए.साळोखे आणि प्रा. डॉ.डी.एन. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment