Posts
Showing posts from August, 2024
पं.दिनदयाल उपाध्याय जयंती
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्र उभारणीत पं.दिनदयाल यांचे कार्य महत्वाचे - प्रा.डाॅ.लक्ष्मण करपे बिद्री : 'राष्ट्रसंघाच्या माध्यमातून पं.दिनदयाल उपाध्याय यांनी राष्ट्रनिर्मितीचे कार्य केले.'असे मत प्रा.डाॅ.लक्ष्मण करपे यांनी व्यक्त केले.ते येथील दूधसाखर महाविद्यालयात पं.दिनदयाल यांच्या जयंतीनिमित्त बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ.सी.वाय.जाधव होते.प्रा.डाॅ.करपे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. डाॅ.करपे पुढे म्हणाले,पं.दिनदयाल यांनी साहित्यिक म्हणूनही मोलाचे योगदान दिले आहे. या जयंती समारंभाचे आयोजन हिंदी विभागाच्यावतीने करण्यात आले होते. प्रा.सुहानी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रा.डाॅ.आनंद वारके यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्षचे सह समन्वयक डॉ.एस. ए. साळोखे, डॉ एन. एम. पाटील, डॉ.एस. आर. पाटील,डॉ. प्रदीप कांबळे, डॉ.एस.ए.गंगावणे.डॉ. एच.डी. धायगुडे,डॉ. एस.जी. खानापुरे,प्राध्यापक,विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी संजय गुरव व बाबासो पोवार उपस्थित होते.